Login

"काय माझा गुन्हा...?" भाग ५३

सामाजिक
दिर्घ कथा लेखन स्पर्धा...
डिसेंबर व जानेवारी...२०२५-२०२६


"काय माझा गुन्हा...?" भाग ५३


माधव – गौरवीमध्ये वाढणारा ताण...

आता दिवस बदलू लागले...
सुरुवातीला माधव रोज तिच्या खोलीत यायचा… आणि तिच्याशी बोलायचा... तीला प्रेमाने जवळ घ्यायचा आणि आपुलकीने विचारपूस करायचा...
"आजचा दिवस कसा गेला...?"
"तु खुश आहेस ना...?"
"तुला काही त्रास तर होत नाही ना...?"
"मी आहे कायम सोबत...
“थोडा वेळ दे… मी सगळं बदलून टाकीन…”
तो म्हणायचा…

आणि त्याच्या बोलण्यावर गौरवी मान हलवायची… पण दिवस बदलत होते… परिस्थिती नाही… हळूहळू माधवही थकू लागला… ऑफिसचा ताण… घरातला संघर्ष… आई–बहीणीचे टोमणे… आणि त्या सगळ्यात गौरवीचं शांत राहणं... त्याला चुकीचं वाटू लागलं…

“तू काहीच कसं बोलत नाहीस…”
तो एकदा चिडून म्हणाला…

तेव्हा गौरवी शांतपणे उत्तर देते...
“मी बोलले तर तुझं घर मोडेल…”

"आणि तु गप्प बसल्यावर काय होतं...?" माधव चिडून विचारतो...
“ मी गप्प राहिली तर मी आतून पुर्णपणे मोडते…”

तो गौरवीचे बोलणं ऐकून गप्प झाला…

पहिल्यांदाच त्याला कळलं...
प्रेम फक्त पळून जाऊन लग्न करण्याने पुरेसं नसतं… तर ते टिकवायला संपूर्ण समाजाशी...सोड कमीत कमी कुटुंबाशी
लढण्याची तयारी लागते… आणि ती लढाई तो एकटा लढतोय… की दोघं मिळून… हा प्रश्न त्याच्याच मनात पहिल्यांदाच उभा राहिला…

शेवटी जे नको व्हायला हवं होतं तेच झालं…
आई आणि बहिण त्याला गौरवी विषयी त्याच्या मनात विष पेरु लागल्या... त्याच्या मनात संशय निर्माण करु लागल्या...

आणि आता तर त्या यावेळी थेट बोलू लागल्या…

त्यांनी अर्धवट ऐकलेली वाक्यं सांगितली…
काही बनावट शंका उभ्या केल्या…
“ती फोन लपवते…”
“ती कोणाशी तरी खूप हसून बोलते…”
“आपण नसताना बाहेर जाते…”
आणि शेवटी तो शब्द… “चारित्र्य…” तो शब्द हळूच
माधवच्या कानात पेरला गेला…

आणि एक अनोळखी पुरुष माधव व गौरवीच्या बेडरूममध्ये आणून ठेवला... जेव्हा गौरवी आंघोळीला बाथरूममध्ये गेली होती... या दोघींनी त्याचे कपडे ओले करुन तीच्या खोलीत बेडवर बसवून ठेवले...

आणि माधव येताच सगळं नाटकं करुन तीला बदनाम करु लागली... व तीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले...

आणि माधवने एकदाही गौरवीकडे पाहून विचारलं नाही...
“हे खरं आहे का…?”

त्याने एकदाही तिचा हात धरून विचारलं नाही...
“तू मला सांग… मी तुझ्यावर विश्वास ठेवतो…”

तो थेट न्यायाधीश झाला… गौरवी समोर उभी होती…
डोळ्यांत अश्रू घळाघळा वाहवत होते… आवाजात थरथर वाढली होती…

ती फक्त म्हणाली...
“माधव… तू एकदा तरी मला ऐकून घे…”

पण तो ऐकायला तयार नव्हता…
“बस!”
तो ओरडला…
“मला अजून काही ऐकायचं नाही… माझ्या घरात अशी बाई राहू शकत नाही…”

तो शब्द
‘अशी बाई’
गौरवीच्या अंगावर थंड पाण्यासारखा पडला…

ती हळूच म्हणाली...
“मी तुझ्यासाठी घर सोडलं… आईबाबांना दुखावलं… स्वप्नं मोडली… आणि आज तू मला चारित्र्यहीन म्हणतोयस…?”

माधवने एकदाही नजरेला नजर दिली नाही…

तो फक्त दरवाजा उघडत म्हणाला...
“निघ…
आणि पुन्हा मागे वळून पाहू नकोस…”

गौरवी त्या घरातून बाहेर पडली…
तीने कोणताही गोंधळ घातला नाही…, तीने कोणताही आरडाओरडा केला नाही…

फक्त एक स्त्री जिचा गुन्हा इतकाच होता की... ती प्रेमात प्रामाणिक होती…

दरवाजा बंद झाला… आणि त्या आवाजासोबत गौरवीचं आयुष्य दोन भागात तुटलं…

लग्नाआधीची गौरवी आणि आजची… एकटी उभी राहिलेली गौरवी...


क्रमशः....

©® प्राची कांबळे (मिनू)


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही."


0

🎭 Series Post

View all